टेलर स्विफ्ट मालामाल
पॉपस्टार टेलर स्विफ्ट गेल्या वर्षीच्या तिच्या घसघशीत कमाईमुळे मालामाल झालीय. सर्वाधिक मालमत्ता असलेल्या बिल बोर्डच्या वार्षिक यादीमध्ये तिचं नाव आलं आहे. ‘लव्ह स्टोरी’, ‘यू बिलोंग विद मी’, ‘अवर साँग’ अशा गाण्यांमधून ती यूथमध्ये प्रचंड पॉप्युलर झाली आहे. जगाच्या कानाकोपर्यात अक्षरश: लाखोंच्या संख्येत तिचे चाहते आहेत. म्युझिक सेल्स, रॉयल्टी, टूर्स अशा सगळ्याची एकत्र बेरीज केली असता 2013 मध्ये तिनं 39 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. यामुळे तिनं पिंक, बेयोन्स, जस्टीन टिंबरलेकसारख्या पॉपस्टार्सना मागे टाकलंय.