शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By चंद्रकांत शिंदे|

द वॉरियर्स वे

आणखी एक बॉलीवुड प

WD
नायक निष्णात मारेकरी असतो. त्याच्यावर एका कुटुंबाला संपवण्याची जबाबदारी सोपवली जाते. तो सगळ्यांना ठार मारतो परंतु लहान मुलाला पाहून त्याचे मन द्रवते आणि तो त्याला मारत नाही. परंतु अन्य कोणीतरी त्याला मारेल म्हणून तो त्या लहान मुलाला घेऊन ते शहर सोडून दुसर्‍या शहरात राहायला जातो. त्या शहरावरही एका क्रूरकर्म्याचा वचक असतो. आपल्या अन्य साथीदारांपासून लहान मुलाला वाचवण्याबरोबरच त्या क्रूरकर्म्याचाही तो कसा खात्मा करतो त्याची कथा म्हणजेच द वॉरियर्स वे.

चित्रपटाची कथा वाचून तुम्हाला लगेच जाणवेल की अशा कथानकाचे अनेक हिंदी चित्रपट पाहिलेले आहेत. मात्र त्या चित्रपटांमध्ये आणि या चित्रपटामध्ये महत्वाचा फरक आहे सादरीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान.

द वॉरियर्स वे ची कथा १९ व्या शतकात घडते. मार्शल आर्ट पाश्चिमात्य काऊबॉय यांचे अनोखे मिश्रण या चित्रपटात स्नोमू ली ने केले आहे. ली चा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचे सादरीकरण, फ्रेमिंग आणि वातावरण निर्मिती खूपच चांगल्या पद्धतीने ली ने केली आहे. प्रत्येक फ्रेममध्ये ली ची एक वेगळी शैली जाणवत राहाते. निंजा असलेला यांग (डॉंग गून जांग) श्रेष्ठ तलवारबाज असतो. त्याच्यावर एका कुटुंबाला मारण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. कुटुंबातील लहान मुलाला न मारता तो त्यासा वाचवण्यासाठी आपल्या गुरुला सोडून अमेरिकेतील एका दूरच्या गावात जाऊन राहू लागतो. या गावात एका सर्कसमधील लोक राहात असतात. गावात तो लॉंड्रीचा व्यवसाय सुरु करतो. येथेच त्याची भेट सुरे फेकण्यात तरबेज लीन (केट बोसवर्थ) शी होते. तो लीनला सुरे फेकण्यात आणखी तरबेज करतो. दोघांमध्ये प्रेम फुलू लागते. लीनच्या संपूर्ण कुटुंबाला कर्नलने ठार मारलेले असते. केथला कर्नलचा बदला घ्यायचा असतो. या गावावर त्याचेच राज्य चालत असते. दुसरीकडे यांगचा बॉस यांग आणि त्याच्यासोबत असलेल्या लहान मुलाला मारण्यासाठी आपल्या साथीदारांसह यांगचा शोच्च् घेत असतो. यांग कर्नल आणि त्याच्या साथीदारांना सर्कसमधील लोकांच्या मदतीने यमसदनी पाठवतो आणि त्याचबरोबर आपला गुरु आणि आपल्या जुन्या साथीदारांपासून लहान मुलाला वाचवून त्यांनाही यमसदनी पोहोचवतो.

मार्शल आर्ट आणि काऊबॉय यांचे मिश्रण आजवर हॉलीवुडच्या अनेक चित्रपटांमध्ये झालेले आहे. जॅकी चेनचा शांघाय नून हा या श्रेणीतील एक बर्‍यापैकी चित्रपट म्हणता येईल. इनंजा एसेसिन नावाचाही एक विनोदी चित्रपट हॉलीवुडमध्ये तयार झाला होता. सीजी ग्राफिक्सच्या मदतीने स्नोमू ली ने १९ व्या शतकातील वातावरणनिर्मिती, हाणामाराची दृश्ये उत्कृष्टरित्या सादर केलेली आहेत. चित्रपटाची भव्यता जाणवत राहाते परंतु चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटातील एकही दृश्य लक्षात राहात नाही. एक सूडकथा पाहून आलो असेच वाटत राहाते.