समजूतदार व्यक्तीशी विवाह करायचा
गायिका, अभिनेत्री सेलिना गोमेज हिला वयाने मोठा असणार्या व्यक्तीशी विवाह करायचा आहे. 23 वर्षीय गायिका सेलिनाचे म्हणणे आहे, आपल्याला जास्त समजूतदार मोठय़ा व्यक्तीशी विवाह करायचा आहे. त्यासाठी मी तयार आहे.
सेलिनाने यावेळी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली. माझ्याकडे पाहिल्यावर वाटते मी कमी वयाची आहे. त्यामुळे माझी इच्छा अडचणीची वाटते. सेलिना अनेक वर्षे 21 वर्षीय जस्टिन बिबरबरोबर प्रेमसंबंध होते. मला अनेक वेळा वाटते मी 16 वर्षाची आहे. हे मत माझ्यासाठी वाईट आहे. कारण मी माझ्यापेक्षा मोठय़ा वयाच्या व्यक्तीबरोबर संबंध जोडण्यासाठी तयारी करत आहे. यावर्षी सेलिनाचे संगीत निर्माता जेडबरोबर नाव जोडले गेले होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार ती केवळ अफवाच होती.