शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

सेलेना गोमेज थिरकली

21 वर्षीय अमेरिकी सिंगर, रिकॉर्डिग ऑर्टिस्ट आणि सुप्रसिद्ध इंटरटेनर सेलेना गोमेजला पाहून सगळेच थक्क झाले. सेलेना हिने गुरुवारी रात्री एका स्टेडियममध्ये अफलातून डान्स केला. यावेळी हजारो प्रेक्षक अक्षरश: तिला पाहातच राहिले. सेलेना यावेळी ‘स्टेज सिंगर’ कमी आणि चीअर लीडरच अधिक दिसत होती. सेलेनाचा अफलातून डान्स पाहून तर प्रोफेशनल चीअर लीडर्सही लाजल्या असाव्यात. सेलेनाचा हा अवतार एनएफएल फुटबॉल गेमदरम्यान पाहायला मिळाला.

PR



टेक्सासमधील एरलिंगटनच्या एटीएंडटी स्टेडियमवर ओकलँड रेडर्स आणि डलास काउब्वायजमध्ये हा गेम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान सेलेनाने केवळ तिच्या आवाजाची नाही तर तिच्या हॉट फिगरचीही जादू दाखवून हजारो प्रेक्षकांना घायाळ केले. प्रेक्षकांनी गेमचा नव्हे तर सेलेनाचा लाजवाब परफार्मचा मनमुराद आनंद लुटला. दरम्यान, सेलेना गोमेजचा तिच्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाला आहे. तेव्हापासून ती बिनधास्त झालीय. खुलेपणाने आयुष्य एन्जाय करते आहे. विशेष म्हणजे ती नव्या बॉयफ्रेंडच्याही शोधात आहे.