रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

हॉलिवूड दिग्दर्शक टोनी स्कॉट यांची आत्महत्या

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक टोनी स्कॉट यांनी रविवारी थेली पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 'टॉप गन', 'डेज ऑफ थंडर्स', 'बेव्हर्ली हिल्स कॉफ टू' या गाजलेल्या चित्रपटांचे स्कॉट यांनी दिग्दर्शन केले होते. स्कॉट यांनी रविवारी थॉमस पुलावर जाऊन खाली उडी मारली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे.

त्यांच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती लेफ्टनंट ज्यो बेल यांनी दिली. स्कॉट यांच्याजवळ आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, पुढील चौकशी सुरू आहे. टोनी स्कॉट हे 'हॉलिवूड' चित्रपट निर्माते रिडले स्कॉट यांचे बंधू होते.