'आई' बनणार आहे पॉप गायिका शकीरा
लोकप्रिय पॉप गायिका शकीराने आपल्या चाहत्यांना एकदम खूश करून दिले की आता अंगाई गीत गाणार आहे. या बातमीला स्वत: शकीराने दुजोरा दिला आहे. या विषयावरून मागील काही दिवसांपासून दक्षिण अमेरिकेतील माध्यमांमध्ये अफवांचे पीक उठले होते.शकीराने तिच्या वेबसाईटवर ती गर्भवती असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये उठलेले अफवांचे पीक शांत झाले आहे. स्पेनचा प्रसिध्द फुटबॉलपटू जेरार्ड पीके (25) हा शकीराचा बॉयफ्रेंड आहे.शकीरा म्हणते, तुमच्यातील काही लोकांना माहित असेल की, आम्ही दोघेही आमच्या पहिल्या अपत्याची आतुरतेने वाट बघत आहोत.कार्यक्रम स्थगित - शकीराने या महत्वपूर्ण घटनेला महत्व देताना आपले आगामी सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारी लास व्हेगास येथील आयहार्ट संगीत समारोहात देखील ती सहभागी होणार नाही. जेरार्ड बार्सिलोना फुटबॉल क्लबकडून खेळतो.