रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

आई बनण्यास तयार नव्हती केटी पेरी

WD
अमेरिकेची सुप्रसिद्ध पॉप गायिका केटी पेरी ही आई बनण्यास तयार नव्हती आणि त्यामुळे तिला पती रसेल ब्राँडपासून वेगळे व्हावे लागल्याची माहिती समोर आली आहे.

दोघांच्या घटस्फोटासाठी हेच कारण असल्याचे समजते. केटी पेरी अलीकडेच तिच्या 'केटी पेरी : पार्ट ऑफ मी' या चित्रपटाच्या प्रचार कार्यक्रमादरम्यान आपल्या लग्नाबाबत सांगितले.

ब्राँड व माझ्यातील मतभेद कुटुंब वाढविण्याच्या मुद्यावर झालेल्या वादाने अधिकच गडद झाले होते, असे केटीने सांगितले. लग्नाच्या वेलीवर मुले रूपी फुले आली नाही, तर त्या लग्नाला अर्थ नसल्याचे रसेल ब्राँडचे मत असल्याचे एका सूत्राने सांगितले.