रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

एमाच्या सौंदर्याचे गुपित उघड

PR


'हॅरी पॉटर' चित्रपटातील हॅरिची मैत्रीण हरमॉइनी ग्रँगरची भूमिका साकारणार्‍या एमा वॉटसमनचे चाहते तिच्या वयाप्रमाणेच वाढत आहेत. याच चाहत्यांसाठी एमाने तिचे सौंदर्याचे गुपित एका पुस्तकात उघड केले आहे. यासाठी तिने स्वत:चे सौंदर्य दाखविणारा विशेष फोटोही काढला आहे.

'नॅचरल ब्युटी वर्क' या जेम्स ह्युस्टनच्या आगामी पुस्तकासाठी 22 वर्षीय एमाचा आंतर्वस्त्रांकीत फोटो काढला आहे.

या पुस्तकात जगभरातल्या सेलिब्रिटींचे 120 फोटो आहेत. यात ब्रूक शिल्ड, कार्ली क्लॉज, एरिझोना म्युज या सेलीब्रिटींचेही या पुस्तकात फोटो आहेत. पर्यावरणाविषयी जागरूकता पसरवणार्‍या सेलिब्रिटींचे यात फोटो आहेत. 'वर्ल्ड अर्थ वीक 2013'ला पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.