रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

कृष्णकृत्ये झाकण्यासाठी अब्जावधींचा खर्च?

WD
लोकप्रिय परंतु तितकाच वादग्रस्त गायक मायकेल जॅक्सनने त्याच्या हयातीत 15 वर्षामध्ये ज्या लहान मुलांचे लैंगिक शोषण केले त्या मुलांनी त्यांची तोंडे बंद ठेवावीत यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख डॉलर (सुमारे 2 अब्ज रूपये) खर्च केले होते, अशी माहिती संडे पीपल या साप्ताहिकाने दिली आहे.

अमेरिकेच्या एफबीआयच्या गोपनीय फाईल्समधील माहिती या साप्ताहिकाने उघड केली आहे. मायकेल जॅक्सन 1989 पासून असे प्रकार करत होता.

या फाईलमधील माहितीनुसार तो विकृत होता व 15 वर्षांच्या काळात त्याने किमान 24 मुलांचे शोषण केले. त्यांनी तोंड उघडू नये यासाठीच त्याने अफाट खर्च केला, असे गोपनीय अहवालात म्हटले आहे. हॉलिवूडमधील नामवंत कलाकारांवर लक्ष ठेवणार्‍या आणि त्यांची खासगी माहिती मिळवणार्‍या अँथनी पेलिकानो याला 2002 मध्ये एफबीआयने ताब्यात घेतले होते.

त्यावेळी त्याच्याकडील सर्व फाईल्स एफबीआयने जप्त केल्यावर, त्यामध्ये मायकेले जॅक्सनविषयी माहिती असलेल्या बर्‍याच फाईल्स एफबीआयच्या हाती लागल्या. यापैकी एक फाइल संडे पीपलच्या हाती लागल्याचा दावा या साप्ताहिकाने केला आहे.

त्याचप्रकारे एका खासगी गुप्तहेराने त्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर या आरोपांची पुष्टी करणारी माहिती संडे पीपलला दिली आहे.