रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

केटी प्राईस करणार तिसर्‍यांदा लग्न!

PR
माजी सुपर मॉडल केटी प्राईस ही तिसर्‍यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. 'सन ऑनलाईन'च्या वृत्तानुसार, केटी हिने बांधकाम व्यावसायिक कायरेन हेलरसोबत विवाह करण्याचे ठाविले आहे. विशेष म्हणजे कायरेन हा केटीपेक्षा वयाने 10 वर्षांनी लहान आहे. केटीचे वय 35 वर्षे असून, कायरेन हा 25 वर्षांचा आहे. अलीकडेच या दोघांनी लग्नाची घोषणा केली आहे. आपण तीन आठवड्यापासून सोबत राहत असल्याचे या जोडप्याचे म्हणणे आहे. केटीने कायरेनसंदर्भात सांगितले, की कायरन हा एक सामान्य मुलगा आहे. त्याच्यासोबत लग्न करून मी सुखी राहील, असेही केटीने सांगितले.