सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

पॉप सिंगर जस्टिन बीबरची गायनातून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबरने गायनातून निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना नाराज केले आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर बीबरने गायनातून निवृत्ती घेत असल्याचे सांगितले. ज्या वयात लोक करियरची सुरुवात करतात, त्याच काळात बीबरने निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे.

WD


जस्टिन बीबरने निवृत्ती घेतल्याचे 'ट्विटर'च्या माध्यमातून जाहीर केले. अनेक वादांमध्ये अडकलेल्या जस्टिनने याआधीच निवृत्तीचे संकेतही दिले होते. बीबर याने 2008 साली गायनाला सुरुवात केली होती. 19 वर्षीय बीबर हा केवळ सिंगरच नव्हे तर तो म्युझिक कंपोज करतो तसेच गाणीही लिहितो. बीबरचे जगभरात चाहते आहेत.