सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

मि. बीनच्या मृत्यूची अफवा

WD
मि.बीन नावाने जगभरात ओळख असलेला सुप्रसिद्ध इंग्रजी हास्यअभिनेता रोवन एटकिंसन याने आत्महत्या केल्याची अफवा फेसबूक आणि ट्विटरवर पसरली आहे.

रोवन एटकिंसन या ५८ वर्षीय हास्यकलाकाराला जॉनी इंग्लिश ३ या चित्रपटाच्या निर्मात्याने तडकाफडकी चित्रपटातून काढून टाकल्याने त्याने नैराश्य आल्याने आत्महत्या केल्याचे सोशल मिडीयावर पसरलेल्या बातमीत म्हटले आहे. हि बातमी सुरुवातीला सीएनएन न्यूज चॅनलवर प्रसिध्द झाल्याचे फेसबूक आणि ट्विटरवर म्हटले आहे. ऑनलाईन धमक्यांबाबत सतर्क असलेल्या ओटीए संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही बातमी सीएनएन न्यूज अपडेटवर प्रसारीत झाली. त्यानंतर ती वा-यासारखी जगभरात पसरली. तसेच मि. बीनने आत्महत्या करण्यापूर्वी या निर्मात्याला आणि आपल्या जगभरातील चाहत्यांना संदेश देणारा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. असेही या वृत्तात पुढे म्हटले आहे.ट्विटरवर फोटोसह १९५५-२०१३ श्रद्धांजली संदेश देण्यात आले आहेत. तर फेसबूकवर आत्महत्या केल्याचा व्हिडीओ पहाण्यासाठी फेसबूक मिडीया प्लग इन डाऊनलोड करण्यासाठी दिले आहेत. मात्र तेथे गेल्यावर कोणताही व्हिडीओ नसल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारचे प्लग इन डाऊनलोड केल्यास तुमच्या संगणकात व्हायरस येण्याचा धोका असल्याचे ओटीएने म्हटले आहे.