शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. हॉलीवूड
Written By
Last Modified: लॉस एंजिल्स , सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:11 IST)

मैडोनाच्या संगीत कार्यक्रमात शकीराची मस्ती

पॉप स्टार शकीरा आणि तिचा ब्यॉयफ्रेंड गेरार्ड पिकने स्पेनच्या बार्सिलोनामध्ये संगीत कार्यक्रमादरम्यान मैडोनासोबत खूप  मस्ती केली.  
 
‘वाका वाका’ची गायिका आणि फुटबॉल खेळाडूने मंचाच्या पाठीमागे ‘लाइक ए प्रेयर’च्या गायिकेसोबत भेट घेतली आणि त्यानंतर ते पलाऊ सेंट जॉर्डीमध्ये लोकांच्या गर्दीत कार्यक्रम बघताना दिसले.  
 
मैडोनाने इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला आहे, जो संगीत कार्यक्रमाआधी घेण्यात आला आहे ज्यात तिघेहे सोबत दिसत आहे.  
 
तिने लिहिले आहे की रविवार रात्री माझ्या कार्यक्रमात शकीरा आणि पिक सामील झाले. मला फार बरे वाटले. 2 मुलांची आई शकीरा बर्‍याच काळापासून मैडोनाची प्रशंसक राहिली आहे. (भाषा)