अफगाणिस्तानात संघर्ष, 17 ठार
मध्य अफगाणिस्तानात एका रस्त्यावर झालेल्या स्फोटात पाच पोलीस कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. तर दुस-या एका घटनेत अफगाण आणि नाटो सैन्याने केलेल्या संयुक्त कारवाईत 12 दहशतवादी ठार झाले आहेत. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका खाजगी वाहनाने जात असलेल्या पोलिसांच्या गाडीचा रस्त्याच्या कोप-यावर ठेवलेल्या बॉम्बच्या स्फोटात अपघात झाला.तर दुस-या एका घटनेत नाटोच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्याने केलेल्या कारवाईत 12 दहशतवादी ठार झाले.