शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By एएनआय|

इराणचे उपराष्ट्रपती इस्‍फंदीयार यांचा राजीनामा

इराणचे राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांचे सहकारी आणि वादग्रस्त उपराष्ट्रपती इस्फंदीयार रहीम मशाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इराणच्‍या उपराष्ट्रपतींनी दिलेल्या राजीनाम्याची पुष्टी शनिवारी 'फर्स' संवाद समितीने दिली आहे.

फर्स यांनी सांगितले की, सर्वोच्च नेत्याच्या आदेशानंतर मी स्वतःला देशाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या पात्रतेचा मानत नाही. परंतु मी क्षमतेनुसार चाहत्यासाठी काम करीत राहील. इराणचे सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खुमैनी यांच्या कथित आदेशानंतर रहीम मशाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देशातील कट्टरवाद्यांच्या विरोद्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे, कोणत्याही मुद्यावर खुमैनी यांचे म्हणणे निर्णायक मानले जाते.