1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

जिवंत उंदीर खाणार्‍याला शिक्षा

मेलबर्न- जिवंत उंदराचे डोके चावताना आपला व्हिडिओ फेसबुकवर टाकणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या एका 25 वर्षाच्या व्यक्तीवर तीन वर्षासाठी पाळीव जनावर पाळण्यावर बंदी लावली असून त्याच्या या विक्षिप्त व्यवहारासाठी 100 तासाची सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
ब्रिस्बेनच्या अल्बिओन येथे राहणार्‍या मॅथ्यू मैलोनी उर्फ मैड मैट याला ब्रिस्बेनच्या मॅजिस्ट्रेट कोर्टाने जनावरांसोबत विध्वंस असल्याचे दोषी मानले. हा व्हिडिओ जानेवारीत पोस्ट केला असून हजार वेळा बघितला गेला आहे. 
 
यात मैलोनी एका बॉक्समधून पाळीव उंदीर काढून त्याचे डोके चावतो. यानंतर तो वोदका पितो. या व्हिडिओवर खूप टीका झाली होती.
 
मॅजिस्ट्रेट सुजेट कोट्स यांनी म्हटले की मैलोनीचे हे कृत्य क्षमा योग्य नसून ज्याने कोणीही हा व्हिडिओ बघितला असेल ते समजू शकतात की हे मूर्खता व्यतिरिक्त काही नाही.
 
न्यायाधीशाने मैलोनीला 100 तास सामुदायिक सेवा करण्याचा दंड दिला आहे, आणि तीन वर्षापर्यंत पाळीव जनावर पाळण्यावर प्रतिबंध लावले आहे. त्याला कोर्टाच्या खर्चाच्या रूपात 89 ऑस्ट्रेलियन डॉलर जमा करण्यासाठी आदेश देण्यात आला आहे.
 
मैलोनी ने म्हटले की मी कोर्टाच्या निर्णयाला मान्य करतो तरी मला असे वाटत नाही की मी जे केले ते इतके वाईट होते. तो हे स्वीकार करायला तयार नाही की त्याच्या या कृत्यामुळे उंदराला काही त्रास झाला असावा. त्याने म्हटले की हे केवळ 29 सेकंदाची वेदना होती.