पाक 'अलकायदा'चे मुख्यालयः अमेरिका
पाकिस्तान अलकायदाचे मुख्यालय बनले असून पाक जगभरात कट्टरवादाचे आश्रयस्थान बनला असल्याचा आरोप अमेरिकेतील प्रभावशाली सीनेटर जॉन कॅरी यांनी केला आहे. वॉशिंग्टन येथील थिंक टँक ‘कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स’ येथे बोलताना कॅरी यांनी सांगितले, की पाकिस्तान आपल्या भूमीवर असलेल्या हक्कानी नेटवर्क, लश्कर ए तैयबा आणि इस्लामी जिहादचे मुख्यालय बनले आहे. त्याकडे अमेरिकेला दुर्लक्ष करून चालणार नाही. सीनेटच्या परराष्ट्र संबंध विषयक समितीचे अध्यक्ष असलेले कॅरी नुकतेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचा दौरा करून आले आहेत. ते म्हणाले, की आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधातील आपल्या लढ्यात अण्वस्त्र संपन्न पाकशिवाय कुठलाही मोर्चा महत्वाचा नाही. पाक अलकायदाचे मुख्यालय असल्याचा आरोप करीत कॅरी यांनी पाकला आणखी आर्थिक मदत देण्यावर भर दिला.