सद्दामच्या आठवणीत संग्रहालय
इराकचे माजी लष्करशहा सद्दाम हुसैन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संग्रहालय उभारण्यासंदर्भात विचार केला जात आहे. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार या संग्रहालयात सद्दाम यांची शस्त्रास्त्रे, मूर्ती, पेंटिंग, फर्निचर आणि त्यांच्याशी संबधित साहित्यही आढळून आले आहेत. पर्यटन आणि पुरातत्व मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल जहरा अल तलकानी यांनी सांगितले, की अमेरिकेच्या हल्ल्यापासून आतापर्यंतची गोळा केलेले हे साहित्य आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.