रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

सावध राहा! या विहिरीच्या पाण्याला स्पर्श कराल तर व्हाल दगड...

लंडन- परिकथेत लोकांना दगड बनताना ऐकले आहे, परंतु इंग्लंडमध्ये खरोखर अशी एक विहीर आहे ज्याला स्पर्श करणारे दगड होतात.
 
इंग्लंडमध्ये निड नदी किनार्‍यावर नेयर्सबरो क्षेत्रात एक विहीर अशी आहे ज्याला स्थानीय लोकं देत्याची विहीर मानतात. याचा उल्लेख केल्यावरदेखील लोकं भिऊन जातात. ही विहीर आपल्या गूढ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. लोकांचे म्हणणे आहे की या विहिरीत काही पडले ते दगडात परिवर्तित होऊन जातं.
या विहीरत पडणारे पाने, लाकडं किंवा जीव हे पाण्यात पडल्यावर दगडात परिवर्तित होतात. या विहीरजवळ जायला लोकं घाबरतात. मात्र एडवेंचर ट्रिपवर येणारे लोकं येथे आपले सामान सोडून जातात आणि काही दिवसाने ती वस्तू दगड झाली का? हे बघायला येतात. आजही येथे 18 व्या शतकाच्या व्हिक्टोरियन टॉप हॉट सारख्या वस्तू येथे बघायला मिळतात.
 
टेडी बियर, सायकल आणि किटली सारख्या अनेक वस्तू येथे पूर्णपणे दगडात बदल्या आहेत. आता हे एका पर्यटक स्थळ म्हणून प्रसिद्ध होत आहे. लोकं येथे येऊन विहीरत झरत असलेल्या पाण्याखाली आपल्या वस्तू लटकवून जातात आणि नंतर त्या दगडात परिवर्तित झाल्या की नाही बघायला येतात.
 
वैज्ञानिकांप्रमाणे या विहिरीच्या पाण्यात असे काही तत्त्व आहेत ज्याने प्रत्येक वस्तू दगडात परिवर्तित होते. तसेच येथील लोकं याला सामान्य विहीर मानत नाही. डेली मेलप्रमाणे या विहिरीत ग्लायकोकॉलेट घटक अती मात्रेत आढळले आहे ज्यात टर्फा आणि ट्रेवरटिन रॉक असल्यामुळे वस्तूंवर कडक धातूचे कवच तयार होऊन जातं जे दगडाप्रमाणे वाटतं.