मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (14:57 IST)

‘मंगळ’मय सन्मान

‘टाइम’ने प्रसिध्द केलेल्या यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम संशोधनाच्या यादीत भारतात यशस्वी झालेल्या ‘मंगळयान’ मोहीमेचा समावेश झाल्याने या मोहीमेच्या यशाला आणखी एक ‘मंगल’ सन्मान जोडला गेला आहे.
 
रशिया, अमेरिका अथवा युरोपातील शास्त्रज्ञांना जमली नाही अशी कामगिरी मंगळयान मोहीमेच्या माध्यमातून भारतीय शास्त्रज्ञांनी करुन दाखविली. त्यामुळेच ‘टाइम’ने याची दखल घेतली असून याच शब्दात या कामगिरीचा सन्मान केला आहे.