Earthquake : फिलिपाइन्समध्ये 7.4 ची तीव्रताचा भूकंप, त्सुनामीचा इशारा
फिलिपाइन्समध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की, फिलिपाइन्समधील मिंडानाओ येथे 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
आज रात्री सुमारे 8:07 वाजता फिलिपाइन्सच्या मिंडानाओमध्ये शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी मोजण्यात आली आहे. सध्या त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने सांगितले की, भूकंपाची तीव्रता पाहता, दक्षिण फिलिपाइन्स आणि इंडोनेशिया, पलाऊ आणि मलेशियाच्या काही भागांमध्ये त्सुनामीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.
वृत्तानुसार, दक्षिण फिलीपिन्समध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
फिलीपिन्सच्या सरकारी एजन्सीने मिंडानाओच्या पूर्व किनार्यावरील सुरिगाव डेल सुर आणि दावो ओरिएंटल प्रांतातील रहिवाशांना उंच जमिनीवर जाण्याचे निर्देश दिले आहेत.
Edited by - Priya Dixit