गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 सप्टेंबर 2022 (11:28 IST)

A History of British Rulers: ब्रिटिश शासकांचा इतिहास : महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जीवनप्रवास

महाराणी एलिझाबेथ द्वितीय, सर्वाधिक काळ राजेपदी राहिलेल्या युकेच्या महाराणी यांचं वयाच्या 96 व्या वर्षी बालमोरल कॅसलमध्ये निधन झालं. त्यांनी 70 वर्षं राज्य केलं.
 
एका छोट्याशा बाळापासून ते ब्रिटनच्या सर्वांत जास्त काळ राज्य करणाऱ्या राणीपर्यंत, त्यांचा हा प्रवास आता आपण फोटोंच्या माध्यमातून पाहणार आहोत.
एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला. लंडनमधील बर्कले स्ट्रीट इथं त्यांचा जन्म झाला. अल्बर्ट, ड्यूक ऑफ यॉर्क हे त्यांचे वडील. अल्बर्ट हे पंचम जॉर्ज यांचे द्वितीय पुत्र. डचेस, फॉर्मर लेडी एलिझाबेथ बोव्स-लियॉन या एलिझाबेथ यांच्या आई.
एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर यांच्या बालपणी पुढे चालून राणीचा मुकूट त्यांच्या डोक्यात विराजमान होईल, याची कुणी कल्पनाही केली नव्हती.
एलिझाबेथ आणि त्यांची बहीण मार्गारेट रोझ या दोघींचं शिक्षण घरच्या घरीच झालं.
1936 मध्ये राजे एडवर्ड आठवे यांनी पदत्याग केल्यानंतर एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज सहावे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर एलिझाबेथ बारस बनल्या.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान एलिझाबेथ आणि त्यांची बहीण मार्गारेट यांना विंडसरला हलवण्यात आलं. बीबीसीवरील चिल्ड्रन अव्हर या कार्यक्रमात सहभागी होताना या दोघी बहिणी
तरुण राजकुमारी एलिझाबेथ दुसऱ्या युद्धाच्या शेवटी सहाय्यक प्रादेशिक सेवा (ATS) मध्ये सामील झाली आणि मालवाहू गाडी चालवायला शिकली.
20 नोव्हेंबर 1947 रोजी वेस्टमिनिस्टर ॲबे इथं एलिझाबेथ यांचं प्रिन्स फिलीप यांच्याशी थाटामाटात लग्न झालं. लग्नावेळी फिलीप यांना 'द ड्यूक ऑफ एडिनबर्ग' ही उपाधी मिळाली.
फिलीप आणि एलिझाबेथ यांना पहिलं अपत्य 1948 मध्ये झालं. त्याचं नाव चार्ल्स. 1950 मध्ये चार्ल्सला बहीण मिळाली. तिचं नाव ॲन.
जानेवारी 1952 मध्ये पंचवीस वर्षीय एलिझाबेथ आणि त्यांचे पती फिलीप परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार होते. एलिझाबेथ यांच्या वडिलांना डॉक्टरांनी घराबाहेर पडण्यास मनाई केली होती. मात्र हा सल्ला न जुमानता ते मुलगी आणि जावयांना सोडायला विमानतळावर पोहोचले. वडिलांची ही शेवटची भेट असेल याची कल्पनाही एलिझाबेथ यांनी त्यावेळी केली नसावी.
त्यानंतर जून 1953 मध्ये वेस्टमिनिस्ट अॅबे येथे एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला.
राज्याभिषेकावेळी इंग्लंड महायुद्धाच्या झळा सोसत होता, मात्र महाराणीचा अर्थात एलिझाबेथ (द्वितीय) यांचा राज्याभिषेक नव्या युगाची नांदी असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं.
1957 मध्ये राणीनं ख्रिसमस डेच्या दिवशी पहिल्यांदा राष्ट्राला संबोधित केलं.
1966 मध्ये वेम्बली येथे राणीनं इंग्लंडचा कर्णधार बॉबी मूरला ज्यूल्स रिमेट ट्रॉफी प्रदान केली. बॉबीच्या नेतृत्वाखालीलं संघानं पश्चिम जर्मनीवर 4-2 ने नमवत विश्वचषकावर नाव कोरलं होतं.
29 ऑक्टोबर 1966 रोजी एलिझाबेथ यांनी वेल्श गावाला भेट दिली. जिथं भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत पँटग्लास ज्युनियर स्कूलमधील 144 लोक मारले गेले होती आणि त्यापैकी 116 मुले होती. यामुळे एलिझाबेथ यांना प्रचंड दु:ख झालं होतं आणि तो त्यांच्या आयुष्यातील मोठा भावनिक क्षण होता.
केर्नारफोन कॅसल येथे एका समारंभात राणीनं औपचारिकपणे तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्सची प्रिन्स ऑफ वेल्सला मुकूट प्रदान केला. तेव्हा त्यांच्या मुलाचं वय केवळ 9 वर्षं होतं. पण, राणीनं आग्रह केला की समारंभाचे महत्त्व त्याला पूर्णपणे समजेपर्यंत थांबायला हवं.
1977 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या शाही राजघराण्याच्या प्रमुखपदी असण्याचा रौप्य महोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. रस्त्यावर मिरवणुका आणि देखावे आयोजित करण्यात आले होते. इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाराणी एलिझाबेथ यांनी 10 आठवड्यांत 36 प्रांताना भेट दिली. एव्हॉन येथे त्यांनी उन्हाळ्यात पाण्याची मजा लुटताना त्यांनी लोकांचं निरीक्षण केले. त्यांनी जगभरातील 56,000 मैलांचा प्रवास देखील उत्सवात केला.
वर्षानुवर्षे राणी एलिझाबेथ यांची सार्वजनिक कर्तव्ये चालूच राहिली. रॉयल न्यूझीलंड पॉलिनेशियन फेस्टिव्हलच्या उदघाटनप्रसंगी त्यांचे आणि ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांचे न्यूझीलंडमध्ये स्वागत करण्यात आले.
ऑगस्ट 1979 मध्ये प्रिन्स फिलिप यांचे काका आणि महाराणींचा लाडका भाऊ लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांचा मृत्यू IRA (आयरिश रिपब्लिक आर्मी)च्या बॉम्बने झाला होता. कुटुंबातील एक जवळचे सदस्य असल्याने लॉर्ड माउंटबॅटन यांनी अनेक वरिष्ठ लष्करी पदे भूषवली होती आणि त्यांचे अंत्यसंस्कार वेस्टमिनिस्टर अॅबे येथे पार पडले.
1981 मध्ये एलिझाबेथ यांचा मोठा मुलगा चार्ल्सने लेडी डायना स्पेन्सरशी लग्न केलं. घटस्फोटापूर्वी चार्ल्स आणि डायना यांना विल्यम आणि हॅरी ही दोन मुलं होती. डायना 1997 मध्ये पॅरिसमध्ये एका कार अपघातात मरण पावली.
ख्रिसमसच्या भाषणादरम्यान राणी एलिझाबेथ यांनी 1992 या वर्षाचं वर्णन 'अत्यंत वाईट वर्षं' असं केलं. या एकाच वर्षात त्यांच्या तीन मुलांचे लग्न मोडले आणि विंडसर कॅसलला आग लागली.
विंडसर आगीचा खर्च भरून काढण्यासाठी बकिंगहम पॅलेस जनतेला पाहण्यासाठी खुला करण्यात आला. महाराणी एलिझाबेथ आणि प्रिन्स ऑफ वेल्स गुंतवणूक उत्पन्नावर कर भरतील, असंही जाहीर करण्यात आलं. राणी यांनी बिस्ले येथे आर्मी रायफल असोसिएशनमध्ये SA80 रायफल चालवून पाहिली.
आपली सून डायना यांच्या निधनानंतर सार्वजनिक ठिकाणी न दिसल्याबद्दल एलिझाबेथ यांना टीकेचा सामना करावा लागला. अखेरीस त्यांनी बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर लोकांकडून श्रद्धांजली स्वीकारली आणि टीव्हीवरील थेट प्रक्षेपण होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे डायना यांना आदरांजली वाहिली
2000 मध्ये एलिझाबेथ यांच्या आईने तिचा 100 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत मुली राजकुमारी मार्गारेट आणि राणी एलिझाबेथ होत्या.
2002 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्या राजेपदाचा सुवर्णमहोत्सव होता. मात्र आई आणि लहान बहीण अर्थात प्रिन्सेस मार्गारेट यांच्या मृत्यूमुळे हा जल्लोष झाकोळला गेला.
मात्र तरीही आणि राजघराण्याचं सत्ताकेंद्र म्हणून भवितव्याविषयी साशंकता असतानाही लाखभर माणसं बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवेशद्वारापाशी जमली होती.
2005 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी आपल्या मोठ्या मुलाचं दुसरं लग्न पाहिलं. प्रिन्स चार्ल्स यांनी विंडसर गिल्डहॉल येथे एका नागरी समारंभात कॅमिला पार्कर बाऊल्सशी लग्न केलं.
महाराणी एलिझाबेथ, त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग, प्रिन्स ऑफ वेल्स आणि डचेस ऑफ कॉर्नवॉल एबरडीनशायरमधील ब्रेमर हाईलँड गेम्सचा आनंद घेताना.
2007 मध्ये लॉन टेनिस असोसिएशनच्या रोहॅम्प्टनमधील नवीन मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी राणी एलिझाबेथ पावसापासून वाचण्यासाठी आश्रय घेताना.
2006 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी वयाचे 80 वर्षं पूर्ण केले. यावेळी त्यांनी म्हटलं, "कोणीही म्हातारा होऊ शकतो; तुम्हाला फक्त दीर्घकाळ जगायचे आहे."
जून 2016 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा 90 वा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या सोहळ्यासाठी रॉयल कुटुंबातील इतर सदस्यांसह त्या सहभागी झाल्या.
ड्यूक ऑफ एडिनबर्गच्या निवृत्तीनंतर राणी एलिझाबेथ यांनी त्यांची सार्वजनिक कर्तव्ये चालू ठेवली. त्यांनी त्यांचा घोडा स्पार्कलर 2018 मध्ये रॉयल विंडसर हॉर्स शोमध्ये स्पर्धा करताना पाहिला.
राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं 9 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं. कोविड साथीच्या काळात त्यांचं निधन झालं. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राणीची ही प्रतिमा अशा हजारो कुटुंबांचं प्रतिनिधित्व करत होती, ज्यांच्या कुटुंबामधील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.