गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 मार्च 2022 (10:25 IST)

अबब ! ही जगातील सर्वात लांब कार आहे, यात बरंच काही आहे, जाणून घ्या

आपण रस्त्यावर जात असताना बऱ्याच महागड्या गाड्या पहिल्या असतील. पण जगातील सर्वात लांब असणारी कार आपण पहिली नसेल. ही कार एवढी लांब आहे की तिच्या समोर बस आणि ट्रक देखील लहान दिसतील. ही जगातील सर्वात लांब कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवली आहे. अशी काय खास आहे ही कर जाणून घेऊ या.
 
जगातील सर्वात लांब कारचे नाव आहे अमेरिकन ड्रीम्स. अमेरिकन ड्रीम्स ही आजची नव्हे तर अनेक वर्षांपासून जगातील सर्वात लांब कार आहे आणि तिचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. ही कार 1986 मध्ये बनवण्यात आली होती आणि ही कार बनवणाऱ्या व्यक्तीचे नाव जे ओहरबर्ग होते, तो कॅलिफोर्नियाचा होता. पण, आता ही कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
 
1986 मध्ये बनवलेली ही कार आता पुन्हा एकदा तयार करण्यात आली आहे. म्हणजेच, ही कार बर्याच काळापासून भंगारात पडून  होती, जी एका व्यक्तीने पुन्हा डिझाइन केली आहे. यानंतर या कारने स्वतःचाच विक्रम मोडला आहे. आता ही कार पुन्हा एकदा जगातील सर्वात लांब कार बनली आहे. यामुळे ही कार पुन्हा एकदा चर्चेत आली असून या कारला खूप पसंती दिली जात आहे.
 
ही एक कस्टमाइज लिमोझिन कार आहे. या कारची लांबी 100 फूट म्हणजेच 30.45 मीटर आहे. अशा परिस्थितीत ही कार किती लांब असेल याचा अंदाज देखील लावू शकता. या कारमध्ये 26 टायर असून कारच्या दोन्ही बाजूला दोन इंजिन आहेत. कार साधारणतः 10 ते 15 फूट इतकी असली तरी ती 100 फूट लांब असते. याने आता सर्व वाहनांचे रेकॉर्ड मोडले आहेत. ही कार दोन्ही बाजूंनी चालवता येते. असे नाही की ही कार केवळ लांबच नाही, तर ती भरपूर लक्झरी अनुभवही देते.

त्यात फक्त जागाच नाही तर स्विमिंग पूल, वॉटरबेड, डायव्हिंग बोर्ड, जकूझी, बाथटब, गोल्फ कोर्स, हेलिपॅडही आहे.या मध्ये , 75 लोक बसू शकतात. या हेलिपॅडवर 5 हजार पौंडांपर्यंत वजन ठेवता येईल. याशिवाय टीव्ही कार, फ्रीज, टेलिफोनसह सर्व सुविधा यात आहेत.