मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 5 मार्च 2022 (19:16 IST)

पुण्यात शॉर्ट कपडे घातल्यामुळे तरुणींना चप्पलनं मारहाण

शॉर्ट कपडे घातले म्हणून पुण्यात काही तरुणींना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
हा धक्कादायक प्रकार रक्षक नगर परिसरात घडला आहे. पीडित तरुणी पेइंग गेस्ट म्हणून राहत असून वेगवेगळ्या कंपनीत कार्यरत आहेत. संबंधित तरुणी राहत्या परिसरात शॉर्ट कपडे घालून फिरतात या कारणातून आरोपींनी त्यांना चप्पलनं मारहाण केली आहे. 
 
तक्रारदार तरुणीनी सांगितलं की आरोपी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण करतात. आता त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींच्या कपड्यांवरून वाद काढला. बुधवारी रात्री काही आरोपी त्यांच्या घरी आले आणि त्यांनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणी शॉर्ट कपडे घालून परिसरात फिरतात असा आरोप करून भांडणाला सुरुवात केली. नंतर आरोपींनी पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणींना चप्पलने मारहाण केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
photo: symbolic