शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (23:22 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त

पंत प्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात तीन हेलीकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 6 मार्च रोजी पुण्यात येणार आहे. तेथून ते हेलिकॉप्टर ने शिवाजीनगर येथील कृषी विद्यालयाच्या मैदानावर पोहोचतील. त्यानंतर महापालिका भवनात येतील. नंतर पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करतील नंतर गरवारे मेट्रो स्थानकावर जाऊन मेट्रो चे लोकार्पण करतील.