1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (14:27 IST)

माहेरून पैसे आणले नाही या कारणावरून पत्नीला पाजले ऍसिड

आपल्या देशात हुंडा देणं आणि घेणं हे गुन्हा आहे. आजही काही घरात हुंडा दिला नाही म्हणून स्त्रीचा छळ केला जातो. आजही काही जीव हुंड्याच्या बळी जातात. असेच काही घडले आहे. पुण्याच्या हडपसर भागात.हडपसर येथील हांडेवाडी रस्त्यावरील इमारतीत एका व्यक्तीने आपल्या पत्नीला माहेरहून फ्लॅटच्या कर्जासाठी लागणारे पैसे माहेरून आणले नाही. या कारणावरून आपल्या पत्नीला फरशी साफ करण्याचे द्रावण पाजून मारण्याचा प्रयत्न केला.रेहान असे या पीडित महिलेले नाव आहे. तर या प्रकरणात सासरच्या लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, फिरदोस आणि रेहान काझी  हे पती पत्नी असून हडपसरच्या हांडेवाडी येथे कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. काही महिन्यापूर्वी रेहान ने फ्लॅट खरेदी केला त्याने हा फ्लॅट कर्जावर घेतला. कर्ज फेडण्यासाठी तो आणि त्यांचे कुटुंबीय पत्नी फिरदोस हिला माहेरून 2 लाख रुपये आणायला आणायला सांगायचे. 
फ़िरदोसला वारंवार सांगून देखील तिने माहेरून पैसे आणले नाही. यावर तिच्या नवऱ्याने आणि सासूने तिला फरशी स्वच्छ करण्याचे द्रावण पाजून जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी फिरदोस ने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून फिरदोसची सासू नजमा काझी, नणंद गझाला काझी ,हिना शेख आणि पती रेहान काझी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून हडपसर पोलीस तपास करत आहे.