शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 2 मार्च 2022 (22:18 IST)

शौचालयाच्या टाकीत पडल्याने ४ जणांचा गुदमरून मृत्यू

पुण्यातील लोणी काळभोर भागात शौचालयाची टाकी साफ करत असताना टाकीत पडून चार जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.एका खासगी निवासस्थानाच्या टाकीत हे चार जण पडले होते. त्यापैकी तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एका तरुणाला बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात यश आले होते. परंतु या तरुणाला त्रास होत असल्याने त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता या तरुणाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, सिकंदर पोपट कसबे,पद्माकर मारुती वाघमारे,कृष्णा दत्ता जाधव आणि रुपेश कांबळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील प्यासा हॉटेल मागे जय मल्हार कृपा इमारत असून शौचालयाच्या टाकीचे काम सुरू होते. त्यावेळी टाकीचे उपासा करण्याचे काम सिकंदर पोपट कसबे,पद्माकर मारुती वाघमारे,कृष्णा दत्ता जाधव आणि रुपेश कांबळे हे चौघे जण करत होते. त्या चौघांपैकी एक जण खाली पडला असता त्याला बाहेर काढत असताना,तिघे जण आतमध्ये पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.