बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (16:33 IST)

18 वर्षीय टिकटॉक स्टारने प्रथम व्हिडिओ बनविला, त्यानंतर आत्महत्या केली

Photo : Instagram
टिकटॉक (TikTok) कदाचित भारतात बंद केला गेला असेल, परंतु हा चिनी मोबाईल अ‍ॅप्लिकेशन अमेरिकेसह इतर देशांमध्ये चालू आहे. अमेरिकेच्या TikTok स्टार डेझरिया क्विंट नॉयस (Dazhariaa Quint Noyes) हिने सोमवारी आत्महत्या केली आहे. ती 18 वर्षांची होती आणि आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडिओही बनविला होता. जो तिचा शेवटचा व्हिडिओ होता.
 
मीडिया रिपोर्टनुसार देझरियाला डी च्या नावाने ओळखले जात होते. तिने आपल्या त्या व्हिडिओला शेवटचा सांगितला. तिने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ठीक आहे मला माहीत आहे की मी तुम्हाला त्रास देत आहे. ही माझी शेवटची पोस्ट आहे.’ तिच्या मृत्यूची पुष्टी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे.
 
डेजरीयाने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर तिच्या पालकांना अतिशय वाईट वाटते. देझरियाचे वडील रहीम अल्लार यांनी गोफंदमी नावाच्या पेजवर आपल्या दु:खाबद्दल लिहिले आहे. त्यांनी त्यात लिहिले आहे, 'माझी मुलगी देझरिया आम्हाला सोडून गेली आहे. ती माझी मित्र होती. मी माझ्या मुलीला पुरण्यास तयार नव्हतो. ती खूप आनंदी होती. '
 
पुढे त्यांनी लिहिले, 'जेव्हा मी घरी यायचो, मला रस्त्यावर पाहून तिला फार आनंद व्हायचा. तिने फक्त माझ्याशी तिच्या तणावाविषयी आणि आत्म-हत्येच्या विचारांबद्दल बोलले पाहिजे अशी मला इच्छा आहे. आम्ही दोघे यावर चर्चा करू शकत होतो. आता मी घरी येतो तर माझी वाट पाहण्यास तू तिथे नसते. बाबा तुझ्यावर प्रेम करतात.