बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 एप्रिल 2022 (21:54 IST)

कुवेतच्या सरकारने राजीनामा दिला, राजकीय संकट आणखी गडद झाले

कुवेतमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ समोर आली आहे. कुवेतच्या सरकारने स्थापनेच्या काही महिन्यांनंतर मंगळवारी राजीनामा दिला. सरकारला काही दिवसांतच अविश्वास ठरावाला सामोरे जावे लागणार होते. यासोबतच या देशात राजकीय संकट गहिरे झाले आहे, त्यामुळे अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि सामाजिक सुधारणा रखडल्या आहेत.
 
कुवेतचे पंतप्रधान शेख सबाह अल-खलिद अल-हमद अल-सबाह यांनी राजकुमार यांच्याकडे मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला, अशी माहिती राज्य वृत्तसंस्था 'कुना'ने दिली आहे. सरकारने राजीनामा देण्यापूर्वी पंतप्रधान अल सबा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला या आठवड्याच्या शेवटी संसदेत अविश्वास प्रस्तावाला सामोरे जावे लागणार होते.
 
गेल्या दीड वर्षात कुवेतच्या तिसऱ्या संयुक्त सरकारने राजीनामा दिला आहे. विरोधक शेख साबाह सरकारच्या विरोधात सातत्याने मोर्चेबांधणी करत होते. गेल्या आठवड्यात, संतप्त खासदारांनी कथित भ्रष्टाचार आणि गैरकारभाराबद्दल पंतप्रधानांवर निशाणा साधला होता आणि अनेक आरोप केले होते. विरोधी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधानांना अयोग्य ठरवत नव्या पंतप्रधानांनी देशाची सत्ता हाती घ्यावी, अशी जाहीर मागणी केली होती.