शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

खूप सेक्सी आहे ती, म्हणून सरकारने घातली तिच्यावर बंदी

कंबोडिया येथील एका अभिनेत्रीवर ती अतिशय सेक्सी असल्यामुळे यासाठी बंदी घालण्यात आली. 24 वर्षीय डेनी क्वॉन हिच्यासोबत ही विचित्र बाब घडली असून ती आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसून चुकली आहे.
तिची या देशातील कल्चर आणि फाईन आर्ट्स मिनिस्टरी सह एका बैठकीत सांगण्यात आले की डेनी हिने मंत्रालयाच्या आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. तिचे सुमारे तीन लाख फॉलोअर्स आहे. त्यांनी म्हटले की सिनेमातील तिच्या भूमिका इरोटिक रोल्स इतर नायिकांपेक्षा भिन्न नाहीत.
 
एका साक्षात्कारात तिने म्हटले की कंबो‍डियात अनेक सेक्सी आर्टिस्ट आहे. त्यातून काही तर माझ्याहून अधिक किसिंग आणि इरोटिक सीन देतात. मला आपले हक्क माहीत आहे की मला कसे कपडे घालायला हवे. परंतु आमचा कल्चर, देशातील लोकं हे स्वीकार करत नाही.
 
ती म्हणाली की बैठकीत मला मुलीप्रमाणे समजवण्यात आले पण मी आपल्या मर्जीप्रमाणे कपडे घालायला स्वतंत्र असल्याचे तिने सांगितले. परंतू आचार संहिता म्हणून डेनीवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली. आता ती 12 महिन्यांपर्यंत कॅमेर्‍यासमोर जाऊ शकत नाही.
 
महिलांच्या हक्कासाठी लढणार्‍या संस्थेने मंत्रालयाच्या या निर्णयाला भयावह म्हटले. त्याच्याप्रमाणे हे लैंगिक भेदभाव आहे. तसेच मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की डेनीने लिखित कराराचे उल्लंघन केले ज्यात तिने सेक्सी कपडे न घालण्याचा वादा केला होता. आणि ती पब्लिक फिगर असल्यामुळे तिला अधिक काळजी घेण्याची गरज आहे.