मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (13:03 IST)

Corona virus चा हाहाकार, चीनहून थेट रिपोर्ट

शांघाय- कोरोना व्हायरस (corona virus) मुळे केवळ चीनच नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटन देखील दहशतमध्ये आहे. या व्हायरसचा प्रभाव तसं तर पूर्ण चीनमध्ये आहे परंतू हुबेई प्रांतातील वुहान यामुळे सर्वात जास्त प्रभावित आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने या व्हायरसला अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, शांघायहून मिळालेल्या माहितीनुसार तेथे स्थिती आता नियंत्रणात आहे.
 
येथील राहणार्‍या एका भारतीयाने नाव न प्रकाशित करण्याच्या शयर्तीवर वेबदुनियाला सांगितले की शांघायमध्ये स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, परंतू वुहानमध्ये परिस्थिती ठीक नाही. यामुळे येथील मेयरला हटवून शांघायच्या मेयरला तेथे पाठवण्यात आले ज्यामुळे स्थितीवर नियंत्रणात यावी.
 
त्यांनी सांगितले की मेडिकल टीम कठोर परिश्रम करून गरजूंना चिकित्सा सुविधा प्रदान करत आहे. सुमारे 10 हजार डॉक्टर वुहान पाठवण्यात आले आहे. हे सर्व दिवस-रात्र मेहनत घेऊन व्हायरसवर नियंत्रित करण्यासाठी काम करत आहे. याच प्रयत्नांमुळे सुमारे 6000 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी सांगितले की 6 फेब्रुवारीपासूनच अँटी व्हायरस मेडिसिन तयार करण्यासाठी सतत टेस्ट सुरू आहे. 
 
Corona virus चं गांर्भीय या वरून लावता येईल की यामुळे जगभरात आतापर्यंत 1368 लोकांचा बळी गेला आहे. यातून चीनच्या हुबेई प्रांतातच 1310 लोकांच्या जीवावर बेतली आहे. कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव चीनच्या वुहान (हुबेई) मध्ये आहे, येथे 1036 लोकांचा मृत्यू झाला आहे.


 
एका वेबसाइटवर उपलब्ध रिअल टाइम डेटानुसार गुरुवार रात्री 8 वाजेपर्यंत 59 हजार 902 लोकांना कोरोना व्हायरसची पुष्टी झाली आहे जेव्हाकी 6143 लोकं या आजाराहून बरे झाले आहेत.
 
13 हजार 435 प्रकरण संशयास्पद आहे. दुसरीकडे जपान आणि फिलिपिन्समध्ये देखील एक-एक व्यक्ती मृत झाल्याची बातमी आहे. तीन भारतीयांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे.


 
चीननंतर कोरोनाचे सर्वाधिक प्रकरण सिंगापूर (50), थायलंड (33), साऊथ कोरिया (28), मलेशिया (19), जर्मनी (16), व्हिएतनाम (16), ऑस्ट्रेलिया (15), अमेरिका (14), फ्रान्स (11), ब्रिटन (9) आणि यूएई (8) मध्ये समोर आले आहेत. कॅनडा, इटली, रूस आणि स्पेनमध्ये देखील या प्रकाराचे प्रकरण समोर आले आहेत.


 
एक रिपोर्ट ही देखील : जरी ही माहिती वेबदुनियाला शांघायहून एका भारतीयाने उपलब्ध केली आहे तरी जगभरातील मीडियामध्ये प्रकाशित होत असलेल्या बातम्या अधिक भीतिदायक आहेत.
 
माहितीनुसार चीन कोरोनाची वास्तव स्थिती जगापासून लपवत आहे. एका सॅटेलाईट फोटोच्या आधारावर दावा केला जात आहे की वुहानच्या आकाशात सल्फर डायऑक्साइड गॅसचं वाढलेलं प्रमाण तेथे 14 हजाराहून अधिक शव जाळल्याचे दर्शवतं.