गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (13:06 IST)

युरोपसह अनेक देशात व्हायरस हल्ला, संगणक ठप्प

युरोपसह जगातील अनेक देशामध्ये कम्प्युटर व्हायरस हल्ला झाला आहे. यामुळे  युरोप, अमेरिका, चीन आणि रशियासह अनेक ठिकाणचे कम्प्युटर ठप्प झाले आहेत. रेनसमवेयर असं या व्हायरसचं नाव आहे. ब्रिटनची नॅशनल हेल्थ सर्विस या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे. इंग्लंडच्या अनेक रुग्णालयांचं म्हणणं आहे की, त्यांचे कम्प्युटर सुरु करण्यासाठी त्यांना खूप अडचणी येत आहेत. जे कम्प्युटर हॅक झाले आहेत. त्यांच्यावर एक मेसेज दाखवण्यात येत आहे. त्यात असं म्हटलं आहे की, फाइल रिकव्हर करायची असल्यास पैसे भरा. हा व्हायरस कम्प्युटरमधील असणाऱ्या फाइल आणि व्हिडिओ इनक्रिप्ट करतो आणि पैसे दिल्यानंतर पुन्हा तुमच्या फाइल सुरु होतात. सुदैवानं हा व्हायरस अद्याप भारतात पसरलेला नाही. पण याचा धोका कायम आहे.