गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 20 मार्च 2023 (13:13 IST)

डिज्नी चार हजार कर्मचाऱ्यांना काढणार ?

Disney
मनोरंजन उद्योगातील दिग्गज डिज्नी चार हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने आपल्या व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांची छाटणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कंपनी एप्रिलमध्ये ही टाळेबंदी करणार आहे. मात्र, कर्मचार्‍यांची छाटणी छोट्या गटात होणार की एकाच वेळी चार हजार नोकर्‍या जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डिस्नेची वार्षिक सभा 3 एप्रिल रोजी होणार आहे. या बैठकीत कपातीची घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे.  
 
कंपनी आपल्या स्ट्रीमिंग सेवा व्यवसायात देखील कपात करू शकते. याआधी, कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी फेब्रुवारीमध्ये डिस्ने सात हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली होती. यामुळे कंपनीची सुमारे सात अब्ज डॉलर्सची बचत होणार आहे.  कंटेंट कमी करण्यासोबतच कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा विचार करत आहे. 
 
Edited By- Priya Dixit