1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 18 मार्च 2017 (12:12 IST)

'डोनाल्ड ट्रम्प तुम्हाला बघून घेईल'

अमेरिकेतील  एका न्यायायलयाने रॉबिन रोडस (57) नावाच्या एका व्यक्तीला अल्पसंख्याक महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी आणि तिला बेकायदेशीरपणे कैद केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या सोबतच रॉबिन रोड्सवर धार्मिक टिप्पणी केल्याचा आरोपदेखील निश्चित करण्यात आला आहे. अमेरिकेतील जॉन एफ. केनेडी विमानतळावर डेल्या स्काय लाऊंजमध्ये काम करत असलेल्या एका अल्पसंख्याक महिलेवर हल्ला करून तिला जखमी केल्याचा आरोप रॉबिन रोड्सवर आहे. द्वेषपूर्वक गुन्हाच्या कलमांतर्गत रॉबिन रोड्सला दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकेच्या काद्यानुसार आता रॉबिन रोड्सला चार वर्षांची शिक्षा होऊ शकते.