सुडानमध्ये ड्रोन हल्ल्यात १५३ जणांचा मृत्यू, गृहयुद्धाने धोकादायक परिस्थिती निर्माण केली
सुडानमधील सुरू असलेले युद्ध नागरिकांसाठी आणखी धोकादायक बनत आहे. सुडान आणि दक्षिण सुडान यांच्यातील वादग्रस्त सीमावर्ती प्रदेश असलेल्या अब्येईमधील बाजारावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात १५३ जणांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार सुडान आणि दक्षिण सुडान यांच्यातील वादग्रस्त सीमावर्ती प्रदेश असलेल्या अब्येईमधील बाजारावर झालेल्या मोठ्या ड्रोन हल्ल्यात किमान १५३ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हा ड्रोन हल्ला अब्येईच्या अमिएत बाजारातील पेट्रोल पंपाजवळ झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे आग लागली, उंच ज्वाला उसळल्या आणि सर्वत्र घबराट पसरली. अनेक जण गंभीर जखमी झाले. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या ड्रोन हल्ल्यासाठी सुडान सैन्याला जबाबदार धरले आहे.

