भंगारात आणली सहा कोटी रुपयांचे सोने
दुबई येथून राज्यातील जेएनपीटी बंदरात भंगार भरुन आलेल्या पाच कंटेनरमध्ये 5 कोटी 50 लाख रुपये किमतीची 19 किलो वजनाची 163 सोन्याची बिस्किटे डीआरआयने (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) टाकलेल्या धाडीत पकडली आहेत. घाटकोपर डीआरआय विभागाने राजेश भानुशाली याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, दोन दिवसांपासून ही कारवाई सुरु होती.
अरब देश असलेल्या दुबईमधून भंगार भरुन पाठवलेले पाच कंटेनर जेएनपीटी बंदरात उतरले होते. तेथून हा कंटेनर उरण येथील बेंडखळजवळील एका यार्डात ठेवण्यात आला, कंटेनरमध्ये सोने पाठवल्याची माहिती डीआरआय विभागाला मिळाली होती. डीआरआय पथकाने दोन दिवसांपूर्वी या यार्डात धाड टाकून 19 किलो वजनाची 163 सोन्याची बिस्किटे जप्त केली. गेल्या आठ दिवसांतील ती दुसरी मोठी कारवाई आहे. याआधी डोंगरीत 110 किलो सोने जप्त करुन दहा जणांना अटक केली होती. आतापर्यंत 40 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या आगोदर सुद्धा या मार्गाने अश्या प्रकारे सोने आले आहे का याची माहिती घेतली जात आहे.