गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2017 (08:17 IST)

एक भलामोठा हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटला

एक भलामोठा हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटला आहे. त्यामुळे अंटार्क्‍टिका द्वीपकल्पाचा आकारच बदलून गेला आहे. सुमारे 5 हजार 800 वर्ग किलोमीटरचा हिमखंड 10 ते 12 जुलैदरम्यान अंटार्क्‍टिकापासून तुटला आहे.
 
लार्सेन सी असे या संपूर्ण हिमखंडाचे नाव होते. मात्र, आता तुटून वेगळ्या झालेल्या या हिमखंडाला ए 68 असे नाव देण्याची येण्याची शक्‍यता आहे. हिमखंड अंटार्क्‍टिकापासून तुटत असल्याचे नासाच्या ऍक्वा मोडीस उपग्रहाने टिपलं होते.