1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (11:25 IST)

पंजशीर खोऱ्यात भीषण युद्धात, 300 तालिबानी मारल्याचा दावा

अफगाण सैन्याने तालिबानचा पराभव स्वीकारला असेल, पण अहमद मसूदच्या सैन्यांनी पंजशीर खोऱ्यातील बागलान प्रांताला काबीज केले आहे आणि 300 हून अधिक तालिबानी लढाऊ मारले गेले आहेत.
 
मीडिया रिपोर्टनुसार, बागलान च्या अंद्राबमध्ये लपलेल्या तालिबानींवर मोठा हल्ला झाला आहे.या हल्ल्यात तालिबानचे मोठे नुकसान झाले आहे.अहवालांनुसार, 300 तालिबानी मारले गेले आहेत आणि अनेकांना तुरुंगात कैद करण्यात आले आहे.
 
तालिबानने इशारा दिला आहे की जर अहमद मसूदचे सैन्य शांततेने आत्मसमर्पण करत नसेल तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल. तथापि, अहमद मसूदने आत्मसमर्पण करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे आणि युद्धाला आव्हान दिले आहे. टोलो न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंजशीरच्या सैनिकांनी वाटेत तालिबानवर हल्ला केला. या हल्ल्यात 300 तालिबान लढाऊ ठार झाल्याचे वृत्त आहे.