शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मार्च 2022 (14:06 IST)

दोन वर्षांत, ओमिक्रॉनपेक्षा धोकादायक व्हेरियंट बाहेर येईल,तज्ञांचा दावा

येत्या दोन वर्षांत कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट समोर येऊ शकतो. हा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षाही अधिक धोकादायक असेल आणि प्रचंड विनाश घडवू शकतो. इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि महामारी तज्ज्ञ ख्रिस व्हिटी यांनी इशारा दिला आहे की कोरोना विषाणू आपल्याला आश्चर्यचकित करू शकतो. 
 
त्यांनी सांगितले की, कोरोनाविरुद्धच्या युद्धात आपल्या सर्वांना खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. कारण येणाऱ्या काळात हा विषाणू आपल्याला त्याच्या व्हेरियंट बद्दल आश्चर्यचकित करत राहील. ते म्हणाले की, कोरोना विषाणू आयुष्यभर राहू शकतो आणि आगामी काळात तो सामान्य फ्लूसारखा होऊ शकतो. 
 
ते म्हणाले की, येत्या दोन वर्षांत नवीन व्हेरियंट मुळे ओमिक्रॉनपेक्षाही अधिक त्रास होऊ शकतो. हा व्हेरियंट कोणत्या ही स्पर्धेत कमकुवत होणार नाही. ते म्हणाले की, हे पूर्णपणे चुकीचे आहे की कोरोना विषाणू संपुष्टात येत आहे आणि तो आता जगात सामान्य स्थितीकडे पोहोचत आहे. कारण नवीन व्हेरियंट केव्हाही येऊ शकतो आणि आपल्याला त्याच्या जोखमीबद्दल पुन्हा विचार करावा लागेल.