शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: पेइचिंग , सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 (14:28 IST)

भारताने चीनमधून येणार्‍यांचा ई-व्हिसा रोखला

विषाणू भारत, अमेरिका, ब्रिटनसह 25 देशांत पसरला
चीनमधून येणार्‍या नागरिकांना देण्यात येणारी ई- व्हिसा सुविधा भारताने तूर्त थांबवली आहे. करोना व्हारसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, करोनाची लागण झाल्याने चीनमध्ये आतार्पंत 300 जणांचा बळी गेला आहे. 14,552 लोकांना याची लागण झाली आहे आणि हा विषाणू भारत, अमेरिका, ब्रिटनसह अन्य 25 देशांत पसरला आहे. 
 
सध्याच्या घडामोडीमुंळे ई-व्हिसाद्वारे चीनमधून भारतात येण्यावर तूर्त बंदी घालण्यात आली आहे, अशी घोषणा भारतीय दूतावासाने केली आहे. चीनचे पासपोर्टधारक आणि चीनमध्ये राहणारे अन्य देशाचे नागरिक यांना ही बंदी लागू असेल. ज्यांना यापूर्वीच्या ई-व्हिसा मिळाला आहे, त्यंचा ई-व्हिसा वैध
नसेल, असेही दूतावासाने जाहीर केले आहे.
 
ज्यांना तातडीच्या कारणासाठी भारतात यायचे आहे ते बीजिंगमधील भारतीय दूतावासाशी किंवा शांघाय किंवा गुआनझोऊ येथील भारतीय वाणिज्य दूतावासाशी तसेच या शहरांमधील भारतीय व्हिसा अ‍ॅप्लिकेशन केंद्रांशी संपर्क साधू शकतील. दरम्यान, रविवारी भारताने चीनमधील 324 नागरिकांना एअर इंडिया  विमानाने मायदेशी परत आणले. यात भारतीयांसह मालदीवचे 7 नागरिक होते.