मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated :लंडन , शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2016 (15:46 IST)

ISISचा लहान दहशतवादी, ब्लास्ट करून 3ला उडवले (व्हिडिओ)

आयएसआयएसने एक नवीन ग्राफिक व्हिडिओ काढला आहे ज्यात चार वर्षाच्या एका ब्रिटिश मुलाला एका कारीत विस्फोट करताना आणि तीन लोकांना मरताना दाखवले आहे. हे तिघेही सिरीयात पश्चिमी देशांसाठी गुप्तहेरी करत होते असा आरोप आहे. 
ब्रिटिश मुलगा बालपणापासूनच आयएसआयएसच्या तावडीत आहे कारण लंडनमध्ये जन्म घेणारी त्याची आई ग्रेस डेयरने इस्लाम धर्म स्वीकारला होता आणि 2012मध्ये सिरीयात येऊन तिने स्वीडिश दहशतवादी अबू बकरशी लग्न केले होते. 
 
मुलाची ओळख त्याचे आजोबा हेनरी डेयरने इसा डेयर म्हणून केली आहे. द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार तो एक महिना अगोदर आयएसआयएसद्वारे एका व्हिडिओमध्ये दिसला होता. ताज व्हिडिओत मुलाला आयएसआयएसचा ट्रेडमार्क असणार्‍या वेशभूषेत दाखवण्यात आले होते ज्यात मुलाच्या डोक्यावर काळी पट्टी बांधण्यात आली आहे आणि हातात एक डिटोनेटर आहे. 
 

मुलाने डिटोनेटर दाबण्याआधी नारंगी वस्त्र परिधान केलेले तीन बंधकांना एका कारीत पाहू शकता. मुलाजवळ उभे असलेल्या एका नकाबपोश व्यक्तीला ब्रिटिश भाषेत पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना चेतावणी देताना एकू शकता.  
 
त्याने म्हटले की ज्या प्रकारे तुम्ही तुमचे गुप्तचर पाठवले आणि आपल्या माणसांना पश्चिममध्ये राहणार्‍या आमच्या बंधूंना मारण्यासाठी बटण दाबण्याचा अधिकार दिला, त्याचप्रमाणे आज आम्ही तुमच्या गुप्तचरांना मारत आहे. 
 
व्हिडिओ सौजन्य : यूट्यूब