माईक पाँपेओहे 'सीआयए'चे नवे संचालक
अमेरिकेची गुप्तचर संस्था असलेल्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या संचालकपदाची शपथ माईक पाँपेओ यांनी घेतली. पाँपेओ हे 'काँग्रेस'चे माजी सदस्य आहेत. 'जगामधील सर्वश्रेष्ठ गुप्तचर खात्याचे नेतृत्व आता तुम्ही करणरा आहात. तुमच्या नेतृत्वाखाली काम करणारे स्त्री व पुरुष हे धैर्य या शब्दाला खरा अर्थ प्राप्त करून देत असतात, असे गौरवोदार अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांनी या प्रसंगी बोलताना काढले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शिफारस केलेल्या पाँपेओ यांच्या नावास सिनेटने सहमती दर्शविली. पाँपेओ यांच्या नावास डेमोक्रॅटिक पक्षाने विरोध दर्शविला होता.