1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2017 (22:10 IST)

मोदीना उत्तम चित्र देत मतदारसंघासाठी मागितले पाणी

लातूर आणि मराठ वाडा येथे भयानक पाण्याची स्थिती आहे. रेल्वेने पाणी दिल्याने मागच्या वर्षी प्रश्न मार्गी लागला होता. मात्र भविष्य पाहता प्रश्न पुन्हा गंभीर होवू शकतो असे चित्र आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी सरसावले आहेत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांचे कापडावरील तैलचित्र भेट देण्यात आले. ते पाहून मोदी हे चांगलेच भारावून गेले.यावेळी डॉ. गायकवाड यांनी विविध मागण्यांचे निवेदन प्रधानमंत्र्यांना सादर केले. लातूरला उजनीतून पाणी पुरवठा करावा यासह अनेक मागण्या खा. गायकवाड यांनी केल्या.  तरलातूरच्या पाण्याची योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली. यावर मोदिनी सकारात्मक असे उत्तर दिले असून मदत नक्की करणार असे त्यांनी सांगितले आहे.

यावेळी त्यांनी थेट मराठीत संवाद साधत आपले काम एकदम चांगले सुरू आहे, काही कमी असल्यास थेट सांगत चला, असे सांगितले. यावेळी डॉ. गायकवाड यांनी लातूरला दिलेला रेल्वेने मोफत पाणीपुरवठा, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ५० हजार मोफत गॅस कनेक्शन्स, मोफत विद्युत कनेक्शन्स, प्रधानमंत्री आवास येाजनेसाठी दिलेला भरघोस निधी, अल्पसंख्याक समाजासाठी राबविलेल्या विविध योजनांबद्दल त्यांचे आभार मानले.