बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

काय म्हणता, गळ्यातून शस्त्रक्रिया करुन तब्बल ५३ दगड बाहेर काढले

दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी इराकमधील एका महिलेवर दुर्लभ शस्त्रक्रिया केली आहे. यामध्ये इराकच्या ६६ वर्षीय महिलेच्या गळ्यातून शस्त्रक्रिया करुन तब्बल ५३ दगड बाहेर काढले आहेत. ही शस्त्रक्रिया कोणतीही चिरफाड न करता करण्यात आली आहे. या संपूर्ण शस्त्रक्रियेसाठी दोन तासांचा कालावधी लागला. 
 
महिलेला जेवणानंतर किंवा काही पियाल्यानंतर घसा दुखणं आणि त्याल सूज येणं अशा समस्या होत होत्या. महिलेल्या तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या गळ्यातील पॅरोटिड ग्रंथीमध्ये अनेक दगड असल्याचं सांगितलं. महिलेच्या उजव्या बाजूला पॅरोटिड नळीत अनेक दगड होते. सर्वात मोठा दगड ८ मिमी आकाराचा होता. हा दगड नळीच्या मधोमध अडकला होता.
 
सियालेंडोस्कोपी नावाच्या प्रक्रियेद्वारा महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी १.३ मीमीचा एक छोटा एंडोस्कोप पॅरोटिड ग्रंथीमध्ये टाकण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान बास्केट आणि फोरसेप्सचा उपयोग करुन एक-एक दगड काढण्यात आला. आता शस्त्रक्रियेनंतर महिलेला घरी पाठवण्यात आलं आहे.