शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (14:45 IST)

काय सांगता, पतीला घटस्फोट देऊन महिलेने कुत्र्याशी बांधली लग्नगाठ

क्रोएशियामध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेने पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्न केले आहे. आता आपण  विचार करत असाल की यात नवल काय, पण इथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे घटस्फोटानंतर महिलेने तिचे लग्न माणसाशी नाही तर एका मादीकुत्र्याशी केले आहे.
हा विचित्र विवाह सोहळा थाटामाटात पार पडला आणि विशेष म्हणजे या लग्नात जवळपास 200 जण सहभागी झाले होते. 47 वर्षीय अमांडा रॉजर्स म्हणते की ती तिच्या मादी कुत्र्याशी लग्न करून खूप आनंदी आहे. तिने  सांगितले की, तिला एका जीवनसाथीमध्ये जे काही हवे आहे, ते तिला शीबामध्ये (मादी कुत्रा) मिळाले आहे.
 
ती महिला म्हणाली, हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटानंतर अमांडा रॉजर्स अनेक महिने अविवाहित राहिली. आता ती त्याची नवीन जोडीदार शीबासोबत खूप खूश आहे. अमांडा रॉजर्सने उघड केले की शीबा तिला तिच्या पहिल्या पतीपेक्षा अधिक आनंदी ठेवते. ती मला हसवते, मला आनंदी ठेवते आणि मी नाराज असताना मला प्रेम देते. तिने आपल्या कुत्र्याशी पूर्ण रीतीभातीने लग्न केले आणि तिचे चुंबन घेतले आणि  आपला साथीदार मानले. अमांडाने सांगितले की, ती माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. 
 
जेव्हा मादी कुत्रा शिबा दोन महिन्यांची होती, तेव्हा पासून तिच्यावर प्रेम होते
अमांडा म्हणते की तिला लहानपणापासूनच स्वत:ला वधूच्या ड्रेसमध्ये पाहायचे होते. दुस-यांदा तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्वतः वधूचा ड्रेस डिझाइन केला. ती म्हणते की, 'शिबा (मादी कुत्र्याशी) लग्न करणे ही खूप आनंदाची भावना आहे, ती मला कधीही त्रास देत नाही, माझी खूप काळजी घेते. एका टीव्ही शोमध्ये अमांडाने सांगितले की शिबा दोन महिन्यांची असताना मी  तिच्या प्रेमात पडले .
त्याचवेळी त्यांना विश्वास होता की एक दिवस ते नक्कीच एक होतील. टीव्ही शो दरम्यान, जेव्हा लोकांनी अमांडाला विचारले की कुत्रा पाळल्यानंतर तिच्याशी लग्न करण्याचा विचार कसा आला? तर ती म्हणाली की ,प्रेमाचे अनेक प्रकार आहे. पण माझे आणि शीबाचे नाते खूप खोल आहे आणि या नवीन नात्याबद्दल तिला  खूप उत्सुकता आहे. त्याचबरोबर हे नाते काळानुरूप अधिक घट्ट होईल, अशी आशाही तिने व्यक्त केली.