गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

केनियन जोडपं ही म्हणते 'तुझे देखा तो...'

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खानच्या ९०च्या दशकात आलेल्या 'दिलवाले दुल्हनीया ले जायंगे' चित्रपट चाहत्यांच्या मनात आजही ताजा आहे. चित्रपटाबद्दलची क्रेझ आज ही चाहत्यांच्या मनात कायम आहे. केनियामध्ये देखील या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे अनेक चाहते आहेत. केनियाच्या एका चाहत्याचा एक व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये एक केनियातील जोडपं 'तुझे देखा तो...' गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा व्हिडिओ बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केला आहे. केनियातील शाहरूख-काजोलचा हा भन्नाट व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटात अनुपम यांनी शाहरूखच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे कजोलच्या वडिलांची भूमिका अभिनेता अमरीश पुरी यांनी साकारली होती. आजही चाहत्यांच्या मनात असलेल्या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्राने केली होती. त्याचप्रमाणे 'तुझे देखा तो...' गाण्याला जतीन-ललीत यांनी या गाण्याला संगीत दिले होते.