1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (15:56 IST)

बॉयफ्रेंडच्या डोळ्यादेखत गेला गर्लफ्रेंडचा जीव

death
काळ कधी आणि कुठे कोणावर कसा झडप घालेल हे कोणीच सांगू शकत नाही. विमानात एका तरुणीचा तिच्या बॉयफ्रेंडच्या डोळ्यादेखत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सदर घटना अमेरिकेची आहे. स्टेफनी स्मिथ असे या मयत तरुणीचे नाव आहे. ती 28 फेब्रुवारी रोजी आपल्या बॉयफ्रेंड सोबत डॉमिनिका रिपब्लिकन हुन नॉर्थ कॅरोलिनाला जात होती. 
 
ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत फिरायला गेली असता तिचे डोळे मागे फिरले , मान एका बाजूला वाकली होती. ती नेहमी अशी मस्करी करायची त्यामुळे तिच्या बॉयफ्रण्ड्ला हे सर्व गम्मत असल्याचे वाटले मात्र ती बेशुद्ध झाली. तिच्या बॉयफ्रेंडला ती मस्करी करत आहे असे वाटले. म्हणून त्याने गांभीर्याने घेतले नाही. विमानात डॉक्टर आणि नर्स तातडीनं धावत मदतीला आले. तिला सिपीआर दिले. तिला विमानातून उतरल्यावर तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले  मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. 
 
स्टेफनीची मैत्रीण मारिया योनो देखील एका दुसऱ्या फ्लाईट मधून हॉलीडेला जात होती.तिने स्टेफनीला फोन केला तेव्हा स्टॅफनी च्या बॉयफ्रेंड ने फोन उचलला तेव्हा स्टेफनी तिच्या शेजारी होती.  
 
 Edited by - Priya Dixit