1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

ट्रम्प यांनी इम्रान खान यांची खिल्ली उडवली

Trump ridicules Imran Khan
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पुन्हा एकदा अपमान झाला आहे. पाकिस्तानच्या एका पत्रकाराने जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होत असल्याचा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला. यावेळी ट्रम्प यांनी इम्रान खान यांची खिल्ली उडवली आणि ‘असले पत्रकार तुम्ही कुठून आणता?’ असा सवालही केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पाकिस्तानला ट्रोल केलं जातंय.
 
डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी पाकिस्तानी पत्रकारांनी वारंवार काश्मीरवर प्रश्न विचारले. पण ट्रम्प त्याकडे दुर्लक्ष करत होते. वारंवार प्रश्न करणारा हा पत्रकार तुमच्या शिष्टमंडळात आलाय का, असंही ट्रम्प यांनी इम्रान खान यांना विचारलं.