मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार
मलेशियामध्ये मंगळवारी सकाळी एक दुःखद घटना घडली. येथे नौदलाचे दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळले आणि अपघात झाला. हे हेलिकॉप्टर रॉयल मलेशियाच्या नौदलाच्या एका कार्यक्रमाची तयारी करत होते. यावेळी दोघेही हवेत एकमेकांवर आदळले. या घटनेत हेलिकॉप्टरमधील 10 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला.
मलेशियाच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, लुमुत नौदल तळावर सकाळी 9.30 वाजता ही घटना घडली. अपघातानंतर सर्व मृतांचे मृतदेह लुमुट आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. याठिकाणी त्यांची ओळख पटल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
वृत्तानुसार, एका हेलिकॉप्टरचा रोटर (पंखा) दुसऱ्या हेलिकॉप्टरच्या रोटरला धडकल्याने हा अपघात झाला आणि दोघेही स्टेडियमच्या जमिनीवर पडले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Edited By- Priya Dixit