शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जून 2017 (12:10 IST)

UK Election: पंतप्रधान थेरेसांना झटका

ब्रिटनमध्ये संसदीय निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात आहे. मतमोजणीत पंतप्रधान पंतप्रधान थेरेसा मे पिछाडीवर आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लेबर पार्टी 205 जागांवर विजयी झाली असून कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 191 जागा जिंकल्या आहेत. 
 
 लंडन - ब्रिटनमध्ये लेबर पक्ष सत्तेवर येण्याची दाट शक्यता दिसत आहे. निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात आहे. मतमोजणीत पंतप्रधान पंतप्रधान थेरेसा मे पिछाडीवर आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार लेबर पार्टी 205 जागांवर विजयी झाली असून कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने 191 जागा जिंकल्या आहेत. 
 
- ब्रिटीश माध्यमांनुसार ब्रिटनमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण झाली असून पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाला बहुमत गमवावे लागले आहे.
 
मतमोजणीपूर्वी घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाला बहुमत गमवावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बहुमत गमवावे लागले तरी देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून हुजूर पक्षाचे स्थान कायम राहील. तर दुसरीकडे मुख्य विरोधी मजूर पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फायदा होताना दिसत आहे. एक्झिट पोल आणि सुरूवातीचे निकाल पाहून मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बिन यांनी थेरेसा मे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. थेरेसा मे यांनी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या. गेल्या काही महिन्यांत ब्रिटनमध्ये दहशतवादी हल्ले झाले. त्याचेही या निवडणुकीवर सावट आहे.
 
दरम्यान, गुरूवारी ६५० जागांसाठी निवडणूक झाली. आतापर्यंत ६५० पैकी ५२० जागांचे निकाल जाहीर झाले असून थेरेसा मे यांच्या हुजूर पक्षाला २४३ जागा मिळाल्या आहेत. तर विरोधी मजूर पक्षाला २२६ जागा मिळाल्या आहेत. स्कॉटिश नॅशनल पार्टीने ३२ जागा पटकावत तिसरे स्थान गाठले आहे.
 
गेल्या तीन वर्षात ब्रिटनमध्ये पार पडलेली ही चौथी मोठी निवडणूक आहे. या निवडणुकीत एकूण 4.6 कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 15 लाख मतदार भारतीय वंशाचे आहेत. याआधी 2014 मध्ये स्कॉटलंडला स्वतंत्र करण्यासाठी जनमत चाचणी घेण्यात आली होती. 2015 मध्ये झालेली निवडणूक आणि त्यानंतर 2016 मध्ये ब्रेक्झिटसाठी मतदान झालं होतं.